राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?; पोलिसांसमोर सुरक्षेचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 09:44 AM2020-01-30T09:44:03+5:302020-01-30T09:44:43+5:30

MNS Morcha : मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून आलं आहे.

MNS Morcha to leave from Mohammed Ali Road under Raj Thackeray? Security question before police | राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?; पोलिसांसमोर सुरक्षेचा प्रश्न

राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोहम्मद अली रोडवरुन निघणार मनसेचा मोर्चा?; पोलिसांसमोर सुरक्षेचा प्रश्न

Next

मुंबई - बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यत काढण्यात येईल. यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मात्र मनसेच्या या मोर्चामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनसेच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार का? हा प्रश्न आहे. 

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला असून मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा मुस्लीम बहुल भागातून जाणार आहे. त्यामुळे या मोर्चामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला अन्य मार्गावरुन जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली असून पोलीस योग्य तो निर्णय घेतील असं सांगितलं आहे. 

सीएएला पाठिंबा नाहीच; एनआरसीसाठी मनसे आग्रही, राज ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट

'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच मनसेचा झेंडा बदलण्यात आला असून यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला आहे. महाअधिवेशनाच्या भाषणातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढला होता. तसेच देशात अंतर्गत कटकारस्थान निर्माण केलं जात असून मोर्च्याला उत्तर मोर्चाने असं सांगत त्यांनी ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. 

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची या मोर्च्याच्या तयारीबाबत बैठक झाली असून मुंबई पोलिसांकडे मनसेने परवानगी मागितली आहे. मोर्चा आझाद मैदानात संपणार हे नक्की पण सुरु कुठून होणार हे पोलिसांनी परवानगी आल्यानंतर कळेल असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राजच हिंदुहृदयसम्राट - अविनाश जाधव

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना ताकीद

दरम्यान, ९ फेब्रुवारीचा मोर्चा हा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (सीएए) पाठिंबा देण्यासाठी नाही. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) बाबत चर्चा होऊ शकते, मात्र समर्थन नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. 
 

Web Title: MNS Morcha to leave from Mohammed Ali Road under Raj Thackeray? Security question before police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.