Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला तरी दगडच राहतात; संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:11 IST

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली. राज ठाकरे यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावरही उत्तरं दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सल्ल्याची गरज नाही ते स्वयंभू नेते आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 

आम्ही स्वयंभूच आहोत. जे स्वयंभू देव असतात त्यांच्या मागेच जनता जाते. जे शिंदुर फासतात त्यांच्यामागे जनता जात नाही. याच्यामुळे जर कोणाची पोटदुखी होत असेल तर सांगा आमच्यातकडे औषध आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. संजय राऊतांच्या या टीकेला आता मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. काही स्वयंभू हे देव होतात. काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला तरी दगडच राहतात, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केली. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वयंभू वक्तव्याचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, आम्ही आहोतच स्वयंभू. म्हणूनच जनता ठाकरे गटासोबत आहे. काही जण दगडांना शेंदूर फासतात आणि लोकांना सांगतात यांना देव म्हणा. मात्र, लोक अशा दगडांना नमस्कार करत नाही. स्वयंभू नेते, देवतानांच तो मान मिळतो. संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ठाकरे घराणे हे स्वयंभू आहे. त्यामुळे स्वयंभू देवतांप्रमाणे ठाकरे कुटुंबाला मान मिळतो. यामुळे त्यांना पोटदुखी होत असेल तर सांगावे, आमच्याकडे त्यावर उपचार आहेत, असा टोलाही संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.

टॅग्स :संदीप देशपांडेसंजय राऊतमनसे