Join us
Daily Top 2Weekly Top 5

“झुकेगा नहीं साला! ‘सामना कार’ आता रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना”; मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 12:55 IST

उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर ‘सामना कार’ रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना, असा टोला मनसेने लगावला आहे.

मुंबई: देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांत प्रचंड मोठे यश मिळून सत्ता राखली आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पंतप्रधान मोदींचे गुजरातमध्ये भव्य स्वागतही करण्यात आले. यातच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी युपी आणि गोव्यातील कामगिरीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. विशेष करून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता मनसेनेही यात उडी घेतली असून, संजय राऊतांना अप्रत्यक्षरित्या खोचक टोला लगावला आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर "सामना कार"रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना. "झुकेगा नहीं साला", असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. 

अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई

भाजप नेते मोहित कंबोज यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. जावेद भाई अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, सलीम-जावेद का साथ टूटने नहीं देंगे!, असे ट्विट मोहित कंबोज राऊतांना उद्देशून केले आहे. मोहित कंबोज सुरुवातीपासूनच नवाब मलिक आणि संजय राऊतांचा उल्लेख जावेद सलीम असा करतात. त्यापैकी नवाब मलिक आता ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊतांनी हार्मोनियम पॅक करावे कोठडीत मलिकांना गााणे ऐकवायचे आहे. अशा अर्थाचे मोहित कंबोज यांनी केल्याने ट्विट आता चांगलेत व्हायरल होत आहे. यामुळे आता संजय राऊत यांना अटक होणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो. हे खरे आहे. पंजाबमध्ये भाजप एक राष्ट्रीय पक्ष असूनही पराभूत झाला. याचेही उत्तर भाजपने द्यावे. आम्हाला नोटांपेक्षा कमी मते मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय प्राप्त झाला असला तरी विजय पचवणे भाजपने शिकले पाहिजे. पराभव पचवणे अनेकदा सोपे असते पण काहींना विजय पचवता येत नाही. मतदारांनी दिलेला विजय पचवा आणि सुडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, देशाचे आणि राज्याचे हित पाहा इतकेच मी सांगतो असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :राजकारणसंदीप देशपांडेसंजय राऊतमनसे