Join us

Coronavirus: 'उद्धव ठाकरेंशी फोनवरुन बोलणं झालं'; डॉक्टर, पोलीसांचे राज ठाकरेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 14:24 IST

कोरोनाचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे.

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या या कामावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, डॉक्टरावर हात उचलणाऱ्या लोकांना डॉक्टर किती महत्वाचे आहे, याची जाणीव झाली असेल. आज सर्व मंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वार बंद आहेत. परंतु रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सरकारी कर्मचारी, केंद्र, राज्य सरकार आपले कर्तव्य बजावत आहे. त्याचे मी अभिनंदन करतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केले होते. नरेंद्र मोदी याचं आवाहन म्हणजे भारत बंद किंवा महाराष्ट्र बंद असा नव्हता. तर जनता कर्फ्यू म्हणजे, एक प्रकारची टेस्ट केस होती असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे.

Coronavirus: लोक ऐकत नाहीत, आता 'हाच' एकमेव उपाय; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती

उद्धव ठाकरेंशी माझं फोनवरुन बोलणं झालं आहे. मी त्यांना काही सुचाना सुचवल्या. यावर माझ्यापर्यत या आल्या असून काम सुरु असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच लोक कोरोनाबाबात गांभीर्य घेत नसतील तर कठोर पावलं उचलण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे. त्याचप्रमाणेआज जे लोक घराबाहेर निघत आहे, गाडी घेऊन फिरत आहे त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हे प्रकरण सहज घेऊ नका असं देखील राज ठाकरेंनी सांगितले.

coronavirus : लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत! मोदी संतप्त

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे ,आरोग्य विभागातील तज्ज्ञ यांच्यासह राजकीय नेते मंडळी देखील नागरिकांना घरीच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे.  मात्र सरकारच्या आवाहनानंतरही निर्णयानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिक काम नसताना देखील घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे.

Coronavirus: कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच; शरद पवारांना विश्वास

दरम्यान, दरम्यान फिलिपिन्समधून आलेल्या प्रवाशाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेला हा आठवा रुग्ण आहे. गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याराज ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार