Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:43 PM2021-04-01T16:43:42+5:302021-04-01T16:50:46+5:30

Rajinikanth: रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. (MNS chief Raj Thackeray has congratulated actor Rajinikanth after receiving the Dadasaheb Phalke award)

MNS chief Raj Thackeray has congratulated actor Rajinikanth after receiving the Dadasaheb Phalke award | Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

Next

मुंबई: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने कोट्यवधी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर, जगभरातून रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, रजनीकांत यांनी काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, असं राज ठाकरे म्हणाले. 

अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. 


रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न...

Posted by Raj Thackeray on Thursday, 1 April 2021

तत्पूर्वी, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला. रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर होताच, सोशल मीडियावर रजनीकांत हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. अनेक दिग्गजांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन रजनीकांतचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले जावडेकर 

दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेसृष्टीशी निगडीत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हा पुरस्कारासाठी नेमणूक केलेल्या पाच समीक्षकांनी एकत्रितपणे रजनीकांत यांच्या नावाचा निर्णय घेतला. यात राजकारण कुठून आले, असे स्पष्ट करत रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाविषयी चर्चा केली. गेल्या 5 दशकांपासून रजनीकांत सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असलेल्या ज्युरींनी एकमताने रजनीकांत यांना हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला, असेही जावडेकर म्हणाले. 

राजकारणात न उतरण्याचा निर्णय

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र, अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.

Web Title: MNS chief Raj Thackeray has congratulated actor Rajinikanth after receiving the Dadasaheb Phalke award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.