mns chief raj thackeray discharge after successful surgery in lilavati hospital | Raj Thackeray: राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज; संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार?

Raj Thackeray: राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज; संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर शनिवारी छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज ठाकरे यांच्या कंबरेजवळच्या स्नायूवर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. (mns chief raj thackeray discharge after successful surgery in lilavati hospital)

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शनिवारी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

टेनिस खेळताना झाली होती दुखापत
राज ठाकरे हे क्रीडा प्रेमी आहेत. जानेवारी महिन्यात टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती तेव्हा समोर आली होती. त्यानंतर पक्षाच्या बैठकीवेळीही राज ठाकरे उपस्थित असताना हाताला प्लास्टर केलेलं असल्याचं दिसून आलं होतं.

लॉकडाऊनबाबत काय बोलणार याकडे लक्ष
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राज्यातील सर्व महत्वाच्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते रुग्णालयात दाखल असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी रोखठोक भूमिका बैठकीत मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर राज ठाकरे आज संध्याकाळी आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. मनसेने लॉकडाऊनला याआधीच आपला विरोध दर्शवला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mns chief raj thackeray discharge after successful surgery in lilavati hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.