mns cheif Raj Thackeray praised global teacher award winner ranjitsinh disale | "महाराष्ट्राला तुमचा अभिमान..."; राज ठाकरेंनी केलं रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक

"महाराष्ट्राला तुमचा अभिमान..."; राज ठाकरेंनी केलं रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक

ठळक मुद्देमराठमोळे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना मिळाला ग्लोबल टीचर पुरस्काररणजीतसिंह डिसले यांच्यावर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षावपुरस्काराची अर्धी रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीतील शिक्षकांना देण्याचं जाहीर केलं

मुंबई
सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रणजीतसिंह डिसले यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. 

"युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना मिळाला. त्यांचं मनापासून अभिनंदन, तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय", असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टीचर पुरस्कर दिला जातो. या पुरस्काराची किंमत ७ कोटी रुपये इतकी आहे.  जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजीतसिंह डिसले यांची निवड झाली आहे. 'क्यूआर कोडेड' पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती रणजीतसिंह डिसले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ९ देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरीता वापरणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mns cheif Raj Thackeray praised global teacher award winner ranjitsinh disale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.