Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव; चौथ्या फेरीत गणित बदललं, भाजपाचा उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:13 IST

कालिदास नाट्यगृहच्या मतमोजणी केंद्राबाहेर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल आता समोर आले आहेत. मुंबईतील मुलुंड विभागातील वार्ड क्रमांक १०६ मध्ये भाजपाचे उमेदवार प्रभाकर शिंदे यांनी विजय मिळवला. प्रभाकर शिंदे यांना ११ हजार ९१२ मते पडली तर मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी यांना ११ हजार ७६९ मते पडली. त्यामुळे १४३ मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

वार्ड क्रमांक १०६ मध्ये सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या फेरीपासून मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी आघाडीवर होते. पहिल्या फेरीत मनसेचे उमेदवार दळवी यांना ४ हजार १११ मते पडली तर भाजपाच्या प्रभाकर शिंदे यांना ३ हजार ६९६ मते पडली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मनसेला ३ हजार ५२३ मते तर प्रभाकर शिंदे यांना ३ हजार ५७९ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत मनसेला ३ हजार ५५२ मते तर भाजपाला ३ हजार ६६५ मते मिळाली. त्यानंतर चौथ्या फेरीत हा मुकाबला पालटला. ज्यात मनसेला कमी मते पडली. चौथ्या फेरीत मनसेला ५४७ तर भाजपाच्या प्रभाकर शिंदे यांना ९५७ मते मिळाली. 

कालिदास नाट्यगृहच्या मतमोजणी केंद्राबाहेर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पहिल्या फेरीपासून जल्लोष करत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा चौथ्या फेरी नंतर मात्र हिरमोड झाला. मुलुंड टी वार्ड मधील या प्रभागातील ही लढत अत्यंत चुरशीची पहावयास मिळाली. दरम्यान या प्रभागाची मतमोजणी करताना चौथ्या फेरी अंती काहीसा संभ्रम दिसून आला. सुरुवातीला १४३ मतांची आघाडी घेत प्रभाकर शिंदे विजयी झाल्याचे सांगण्यात आले. परंतु अचानक आकड्यांचा खेळ बदलला आणि या शिंदे यांनी फेर मतमोजणीत १६४ मतांची आघाडी घेतली असं सांगण्यात आले. 

BMC Election Results 2026 LIVE: मुंबईत महायुतीने गाठला बहुमताचा आकडा, ठाकरेंचं पानिपत

English
हिंदी सारांश
Web Title : MNS Candidate Narrowly Loses by 143 Votes; BJP Wins

Web Summary : In Mumbai's Ward 106, BJP's Prabhakar Shinde won by 143 votes, defeating MNS's Satyavan Dalvi. Initial rounds favored Dalvi, but Shinde surged ahead in the fourth round, leading to a tense vote recount and eventual victory.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६भाजपामनसे