रिलायन्स जिओ अन् जीटीपीएल कंपनीविरोधात मनसेचा आक्रमक लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 22:15 IST2018-07-30T22:14:36+5:302018-07-30T22:15:28+5:30
रिलायन्स समुह स्थित जिओ कंपनीमुळे महाराष्ट्रातील हजारो केबलचालक व कर्मचाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे लढा देण्याचा निर्धार मनसेने केला आहे.

रिलायन्स जिओ अन् जीटीपीएल कंपनीविरोधात मनसेचा आक्रमक लढा
मुंबई - रिलायन्स समुह स्थित जिओ कंपनीमुळे महाराष्ट्रातील हजारो केबलचालक व कर्मचाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे लढा देण्याचा निर्धार मनसेने केला आहे. त्यासाठी आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून गोरेगाव येथील मनसेच्यावतीने जीटीपीएल कंपनीविरुद्ध आंदोलन करण्यात आले.
गुजरात स्थित जी.टी.पी.एल केबल कंपनी महाराष्ट्रात कमी दराने केबल देउन स्थानिक केबल चालकांच्या व्यवसायावर गदा आणत आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात मनसेचे विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी आक्रमकपणे लढा उभारला आहे. गोरेगाव विभागात जाळे पसरवू पहाणाऱ्या या जिओ आणि जीटीपीएल कंपनींचे संपूर्ण जाळे आज मनसेचे गोरेगाव विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी मोडीत काढले. तसेच उपविभाग अध्यक्ष राजू साटम, शाखाध्यक्ष संजय खानोलकर, दिपक पवार, तुषार भेलेकर, मुकेश मल्होत्रा यांच्या सहकार्याने हे सर्व जाळे नेस्तनाबुत करण्यात आले आहे. मनसे प्रेणीत महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना संघटना अशा कुठल्याही मुजोर कारभारास महाराष्ट्रात उभारी घेऊ देणार नसल्याचे यावेळी विरेंद्र जाधव यांनी म्हटले.