Join us  

आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:34 PM

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे.

मुंबई – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा सोशल मीडियात ट्रोल होऊ लागले आहेत. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी आगरकरांऐवजी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरला, त्यानंतर सोशल मीडियात याबाबत ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट करत दुसरी पोस्ट केली असं सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. नेटिझन्सने हा प्रकार समोर आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की ओढावली, लोकमान्य टिळकांचे नामकरण कधी झाले? फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची अशा शब्दात नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले आहे. यानंतर गोपीचंड पडळकर यांनी आगरकरांना अभिवादन करणारी पोस्ट टाकल्याचं दिसून आलं असं सांगण्यात येत आहे.

मात्र सोशल मीडियातील या ट्रोलिंगवर आमदार गोपीचंद पडळकरांशी लोकमतने संपर्क साधला असता, त्यांनी मी माझ्या ट्विटरवर गोपाळ गणेश आगरकरांचा फोटो पोस्ट करत अभिवादन केले, मात्र राष्ट्रवादीच्या लोकांकडून जाणुनबुजून अशाप्रकारे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत असा आरोप पडळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष वाढला होता, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे अशी जहरी टीका केली होती. त्यानंतर पडळकरांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे पुतळे जाळले होते, तर पडळकरांना मारण्याचीही धमकी दिली होती.

यानंतर या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांची बाजू सावरुन नेण्याचा प्रयत्न केला होता, अशाप्रकारे एखाद्या नेत्यावर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही अशी समज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिली होती, तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून पडळकर समर्थक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पुढे सरसावले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोशल मीडियात गोपीचंद पडळकर ट्रोल होत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

दक्षिण चीनच्या सागरी भागात तणाव वाढला; अमेरिकेची थेट चीनला धमकी, तर ड्रॅगनही संतापला

सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा

 ‘ते’ २२ आमदार गेले कुठे?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसचं टेन्शन वाढलं

WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका; जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल तर...

राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट

टॅग्स :गोपीचंद पडळकरलोकमान्य टिळकभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार