WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका; जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 10:49 AM2020-07-14T10:49:59+5:302020-07-14T11:29:41+5:30

व्हॉट्सअ‍ॅपच्या सुधारित व्हर्जनला उत्तम गोपनीयता आणि सुरक्षेसाठी चांगला पर्याय म्हणता येणार नाही.

Whatsapp Users Are At High Risk Of Data Theft Due To Fake And Modified Version Of App | WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका; जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल तर...

WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका; जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल तर...

Next

नवी दिल्ली – सध्याच्या इंटरनेट युगात सर्वांचा कल व्हॉट्सअ‍ॅपकडे आहे. चॅटिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपच तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र WhatsApp युजर्सवर धोक्याचं संकट उभं राहिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बनावट आवृत्तीबद्दल वापरकर्त्यांना सतर्क केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बातम्या आणि अपडेट सांगणाऱ्या वेबसाइट WABetainfo नं व्हॉट्सअ‍ॅपच्या सुधारित आवृत्तीविषयी इशारा जारी केली आहे.

डब्ल्यूएबेटाइन्फोने(WABetainfo) आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या सुधारित व्हर्जनला उत्तम गोपनीयता आणि सुरक्षेसाठी चांगला पर्याय म्हणता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचं मॉडिफाइड व्हर्जन आकर्षक वाटू शकतं पण हे इतकंही चांगले नाही त्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करावा लागेल असं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

मॉडिफाइड व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हॅकर्स सहजरित्या युजर्सला आपल्याला लक्ष्य बनवू शकतात. हे बनावट , व्हॉट्सअ‍ॅप डेव्हल्पर्स मैन-इन-द-मिडिल(MITM) हल्ला हॅकर्सकडून युजर्सचा डेटा चोरी करु शकतं. या अपडेटच्या माध्यमातून हॅकर्स सॉफ्टवेअर एडिट करुन चॅटिंगचे एक्सेस घेऊ शकते आणि मेसेज वाचण्यासोबतच त्याला एडिटही करु शकतं.

जारी केलेल्या चेतावनीमध्ये हेदेखील सांगितलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅपचं मॉडिफाइड व्हर्जन कंपनीकडून पडताळणी केली नाही. जर कोणताही युजर्स याचा वापर करत असेल तर त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंदी आणली जाऊ शकते. अनेकदा युजर्स अधिक फिचर्सच्या लालसेपोटी ऑरिजिनल ऐवजी बनावट फेक व्हर्जन वापरणं सुरु करतात. ते युजर्सच्या सिक्युरिटी आणि प्रायव्हेसीसाठी धोकादायक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचं अधिकृत व्हर्जन तुम्ही ऐपल स्टोर अथवा गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करु शकता. त्याचसोबत जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचं कोणतंही नवीन फिचर्स दुसऱ्या युजर्सच्या आधी वापरायचं असेल तर त्याला त्यासाठी  व्हॉट्सअ‍ॅपचं बीटा व्हर्जनचा वापर करावा लागेल.  

दरम्यान, भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. पण तरी देखील सायबर क्रिमिनल्स टिकटॉकच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. फेक लिंकच्या माध्यमातून युजर्सवर अटॅक केला जात आहे. मालवेअर इंजेक्ट केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट लिंकच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना टार्गेट केलं जात आहे. यासोबतच मेसेजवरून ही लोकांना लक्ष्य केलं जात आहे. भारतात सायबर क्रिमिनल्स टिकटॉकवरील बंदीचा फायदा उठवून टिकटॉक व्हिडीओची लिंक पाठवतात आणि निशाणा साधतात. अशा लिंकवर क्लिक केल्यास युजर्सची सुरक्षितता धोक्यात येते. त्यांचा महत्त्वाचा डेटा चोरला जाऊ शकतो. यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

दक्षिण चीनच्या सागरी भागात तणाव वाढला; अमेरिकेची थेट चीनला धमकी, तर ड्रगनही संतापला

सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा

राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट

सरकार अस्थिर करण्याचं राष्ट्रीय कार्य पडद्यामागून सुरु; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

 

Web Title: Whatsapp Users Are At High Risk Of Data Theft Due To Fake And Modified Version Of App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.