Join us

आमदार अपात्रता: अजितदादा गटाला आणखी मुदत हवी; शरद पवार गटाची उत्तरे आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:01 IST

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावून आठ दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार अपात्रता सुनावणीची प्रक्रियाही सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद आमदारांना पाठविण्यात आलेल्या नोटिशींचे उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून आणखी एक महिन्याची मुदत मागण्यात आली आहे. 

८ डिसेंबर रोजी विधिमंडळाकडून दोन्ही गटांतील विधान परिषद आमदारांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. अजित पवार गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली असली तरी पवार गटातील आमदारांनी मात्र नोटिसीला उत्तर दिले आहे.

शरद पवार गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रतेबाबत नोटीस देण्यात आली आहे. तर अजित पवार गटातील अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक-निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण यांना नोटीस देण्यात आली आहे. 

दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस 

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ८ डिसेंबर रोजी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावून आठ दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसविधान भवनशरद पवारअजित पवार