नवरात्रोत्सवात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरू ठेवा, आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:26 IST2023-10-12T14:24:47+5:302023-10-12T14:26:05+5:30
उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक बाहेर पडत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

नवरात्रोत्सवात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरू ठेवा, आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई : नवरात्रोत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.