-घनःश्याम सोनार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा यावर्षीचा ४,२४८ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर यांना सादर केला. यंदापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तीन प्रयोगशाळा आणि तीन उत्कृष्ट कला केंद्रे उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी 'मिशन संपूर्ण' अंतर्गत सहशालेय उपक्रमांना चालना देत नव्या शिक्षण उपक्रमांचा समावेश करून 'मिशन सफल' राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
बदलत्या काळानुसार पालिकेच्या विद्यार्थ्यांना एआय आधारीत तीन प्रयोगशाळा देण्याची सुरुवात या वर्षापासून करीत आहोत. अर्थसंकल्पात जरी त्याचा उल्लेख नसेल तरी आम्ही स्वतंत्र सूचना प्रस्ताव प्रशासनाकडे देणार असल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.
कशासाठी किती तरतूद ?
'इको वॉरियर्स' पर्यावरण संवर्धन उपक्रम : २ कोटी ४० लाख रुपये
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल : प्राथमिक विभाग : ६ कोटी ७ लाख रुपये,
माध्यमिक शाळा : ९ लाख रुपये
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष थेरपी साहित्य : १० लाख रुपये
पालिका शाळांतील ग्रंथालय आधुनिकीकरणासाठी : ५ कोटी रुपये
बालवाड्यांसाठी : २ कोटी ३३ लाख रु.
डिजिटल क्लासरूम : २४.४६ कोटी रु.
पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना जादुई पिटारा ज्ञानपेटीसाठी : २ कोटी रुपये
पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बेस्ट बस सेवा : ८ कोटी ७० लाख रुपये
दहावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य : १९ लाख रुपये
Web Summary : Mumbai's education budget emphasizes 'Mission Safal,' incorporating AI labs and arts centers. ₹4,248.80 crore allocated, prioritizing co-curricular activities, digital classrooms, and student support, including transport and library upgrades.
Web Summary : मुंबई के शिक्षा बजट में 'मिशन सफल' पर जोर, जिसमें एआई प्रयोगशालाएं और कला केंद्र शामिल हैं। ₹4,248.80 करोड़ आवंटित, सह-पाठयक्रम गतिविधियों, डिजिटल क्लासरूम और परिवहन और पुस्तकालय उन्नयन सहित छात्र सहायता को प्राथमिकता।