मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:01 IST2020-06-20T19:01:14+5:302020-06-20T19:01:44+5:30

मान्सून मिशन मॉडयुलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल : अल निनो, ला निना : यंदाचा मान्सून दमदार बरसणार

Mission Monsoon; 70% more showers than average | मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी

मिशन मान्सून; सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक सरी


मुंबई : येत्या काही दिवसांतच मान्सून संपुर्ण देश व्यापणार आहे. देश व्यापतानाच मान्सूनवर इतर कोणतीही हवामान प्रणाली प्रभाव टाकणार नाही. परिणामी केवळ आताच नाही तर पुढील काळातही मान्सूनवर कोणत्याही हवामान प्रमाणालीचा प्रभाव राहणार नाही. परिणामी मान्सूनवर अल निनोचे संकट नाही. त्यामुळे मान्सूनचा वर्षाव जोरदार होईल. विशेष म्हणजे मान्सूनची स्वत:ची अशी एक क्षमता आणि वैशिष्टय असते; आणि याच जोरावर यंदा मान्सून बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मान्सून मिशन मॉडयुलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल. तर महाराष्ट्रातहीपाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.

आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर अल निनो आणि ला निना हे सर्वसाधारणरित्या एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान विकसित होतात. त्यानंतरच्या काळात ते सक्रीय असतात. अल निनो, ला निनाची स्थिती नऊ ते बारा महिने असते. कधी कधी दोन वर्ष देखील त्याचे अस्तित्त्व जाणवते. अल नीनो दोन ते सात वर्षांनी पुन्हा सक्रीय होतो. सध्या प्रशांत महासागरातील हवामानुसार यावेळी अल निनोचा प्रभाव राहणार नाही. प्रशांत महासागरातील पूर्व आणि मध्य क्षेत्रात; जेथे निनो असण्याचे संकेत मिळतात किंवा मिळत नाही ते क्षेत्र गेल्या आठ महिन्यांपासून उष्ण राहिले. त्यानंतर समुद्राच्या तापमानात घट झाली. आणि आता अशी आशा आहे की मान्सून काळात समुद्रावरील तापमान वाढणार नाही. म्हणजेच अल निनोचा प्रभाव मान्सूनवर राहणार नाही. याचवेळी ला निनाची स्थिती निर्माण होईल. मात्र त्याचा प्रभाव तेवढा राहणार नाही. एका अर्थाने यावेळी मान्सून स्वत:च्या क्षमतेसह वैशिष्टयनुसार बरसणार आहे.

..................................

- मान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो यंदा न्युट्रल आहे. हे आपल्यासाठी सुचिन्ह आहे.
- ला निना आपल्या मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे सुद्धा आपल्यासाठी सुचिन्ह आहे.
- हे सर्व घटक असे दर्शवित आहेत की एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येणार आहे.
- जून ते सप्टेंबरदरम्यानचा जो पाऊस असेल तो सरासरी एवढा असेल.
- सर्वसाधारण पावसात ९६ टक्के ते १०४ टक्के  एवढा पाऊस गृहित धरला जातो.
- देशाचा सरासरी पाऊस हा ८८ सेंटीमीटर आहे.
- यंदा संपुर्ण देशाचा पाऊस त्याच्या सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडणार आहे.
- मान्सून मिशन मॉडयुलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल.
- संपुर्ण दक्षिण आशियाचा विचार करता संपुर्ण देशात सर्वदूर सरासरीएवढा पाऊस असेल.
- दक्षिण भारत, उत्तर पश्चिम भारतात पाऊस सरासरी पेक्षा जास्त असेल.
- महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.

 

Web Title: Mission Monsoon; 70% more showers than average