मीरा भाईंदर-वसई-विरारमध्ये पोलिसांनी लागू केला मनाई आदेश, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 05:51 PM2021-11-14T17:51:53+5:302021-11-14T17:52:04+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या  हद्दीत १५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पोलिसांनी मनाई आदेश लागू ...

In Mira Bhayander-Vasai-Virar, the police imposed a restraining order | मीरा भाईंदर-वसई-विरारमध्ये पोलिसांनी लागू केला मनाई आदेश, 'हे' आहे कारण

मीरा भाईंदर-वसई-विरारमध्ये पोलिसांनी लागू केला मनाई आदेश, 'हे' आहे कारण

Next

मीरारोड - मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या  हद्दीत १५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत .  शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांचे जिवित व वित्त सुरक्षित राहावे , समाज कंटक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधक कारवाई करता यावी म्हणून मनाई आदेश लागू केल्याचे पोलीस आयुक्त विजयकांत सागर यांनी नमूद केले आहे . 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ मधील अधिकारांचा वापर करून १५ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजल्या पासून २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजे पर्यंत मनाई आदेश जरी केला आहे . मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे . 

पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे, इजा करण्यासाठी शस्त्र वा ज्वलनशील स्फोटक पदार्थ बाळगणे ,  प्रतिमा दहन करणे , सार्वजनिक घोषणा देणे , गाणी वा वाद्य वाजवणे, शांतता धोक्यात आणणारी भाषणे - कृती करणे आदींना मनाई केली आहे . मनाई आदेश हा पोलिसांनी दिलेल्या परवानग्या , लग्न वा अंत्यसंस्कार साठी जमलेल्याना तसेच सरकारी कार्यालये , शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेल्या लोकांसाठी लागू राहणार नाही असे पोलिसांनी म्हटले आहे .  

Web Title: In Mira Bhayander-Vasai-Virar, the police imposed a restraining order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.