आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:12 AM2018-07-20T01:12:12+5:302018-07-20T01:13:12+5:30

मुलीच्या मातेसह एकावर पोलिसांनी ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Minor girl raped by mother's lover | आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

मुंबई : विवाहितेच्या प्रियकराने १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मेघवाडी परिसरात घडली. या प्रकरणी मुलीच्या मातेसह एकावर पोलिसांनी ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एम. गवस असे अत्याचार करणाऱ्याचे नाव असून तो राज्य राखीव दलात टेलरचे काम करीत आहे. फेबु्रवारी महिन्यात हे कृत्य घडल्याचे तक्रारीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलगी रमा (नावात बदल) हिच्या आई-वडिलांचे एकमेकांशी पटत नसल्याने तिची आई स्वतंत्र राहते, तर रमा वडिलांसमवेत राहते. रमाच्या आईचे गवस नामक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असून एसआरपीएफ कॅम्पमध्ये तो टेलरचे काम करतो. तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात गवस रमाला काही खरेदीच्या निमित्ताने त्याच्यासोबत घेऊन गेला. त्या वेळी त्याने तिला खोलीत बंद करून लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार रमाने तिच्या आईला जाऊन सांगितला. मात्र तिच्या आईने तिची काहीच मदत केली नाही. उलट तिने मारहाण करण्याची धमकी दिली.

Web Title: Minor girl raped by mother's lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.