लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं; कोण आहे जितेंद्र आव्हाड यांचा जावई?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:17 IST2021-12-07T19:16:23+5:302021-12-07T19:17:41+5:30

नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला.

Minister Jitendra Awhad's son-in-law is working in a multinational company in Spain | लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं; कोण आहे जितेंद्र आव्हाड यांचा जावई?, जाणून घ्या!

लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं; कोण आहे जितेंद्र आव्हाड यांचा जावई?, जाणून घ्या!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने मुलीचं लग्न लावलं. जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाला काही मोजकी मंडळी उपस्थित होती. 

नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. 

शाळेतला जोडीदारच तिचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं असून मतदारसंघातल्या लोकांसाठी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे.

दरम्यान, मुलीच्या विवाहसोहळ्यावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पहायला मिळालं. वडिलांच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून नताशा आव्हाडही भावूक झाली होती. २५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे, असं सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी अश्रू आवरत नव्हते.

Web Title: Minister Jitendra Awhad's son-in-law is working in a multinational company in Spain