वडील आमदारांना घेऊन सूरतमधून थेट गुवाहटीला; श्रीकांत शिंदे स्पेनला की पेणला...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:50 IST2022-06-23T15:46:50+5:302022-06-23T15:50:14+5:30
मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मोबाईल देखील नॉट रिचेबल आहे.

वडील आमदारांना घेऊन सूरतमधून थेट गुवाहटीला; श्रीकांत शिंदे स्पेनला की पेणला...!
कुजबुज-
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील आमदार, नेते यांच्या सतत खणखणणाऱ्या मोबाईलला थोडी विश्रांती मिळाली. अर्थात त्यांनी दुसरे मोबाईल नंबर घेऊन संपर्क ठेवला असेल; पण त्यांचे सर्वपरिचित मोबाईल नंबर नॉट रिचेबल आहेत.
मंगळवारी सकाळपासून घडामोडी सुरु झाल्यावर शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कुठे आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. तेव्हा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अनेक निकटवर्तीयांनी ते स्पेनला असल्याचे सांगितले. मात्र तुम्ही फोनवर चुकून स्पेनला गेल्याचे ऐकले ते पेणला गेले असतील, असे शिवसैनिकच टाळी देऊन बोलत आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे ठाण्यातील घरी नाहीत. डोंबिवलीतील सदगुरु निवास याठिकाणीही नाहीत, मग ते स्पेनमधून वडिलांच्या राजकीय भूकंपाकडे पाहात आहेत की, पेणमध्ये गेले असताना चुकून स्पेन ऐकले, असे वाटून अनेकजण कान साफ करुन घेत आहेत.