राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक, नाट्यनिर्मिती खर्च, दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ: आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:59 IST2025-08-21T13:59:50+5:302025-08-21T13:59:50+5:30

Ashish Shelar: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

minister ashish shelar informed about prize money in state drama competition drama production expenses daily allowance doubled | राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक, नाट्यनिर्मिती खर्च, दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ: आशिष शेलार

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक, नाट्यनिर्मिती खर्च, दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ: आशिष शेलार

Ashish Shelar: सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती जो खर्च देण्यात येतो. तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य व व्यावसायिक नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सदरच्या शासन निर्णयातील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्ता इ. तील वाढीव रकमांचा लाभ दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरू होणाऱ्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेपासून लागू होणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्था व कलाकारांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतात. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मिती खर्च देण्यात येतो. तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो.  गेली अनेक वर्ष राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्था व कलाकारांनी पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात वाढ करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सकारात्मक निर्णय घेऊन यामध्ये दुपटीने वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

 

Web Title: minister ashish shelar informed about prize money in state drama competition drama production expenses daily allowance doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.