मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 07:05 AM2019-09-05T07:05:22+5:302019-09-05T07:05:27+5:30

एनडीआरएफचे पथक मदतीला; कुर्ला क्रांतीनगरवासीयांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था

Migration of citizens living on the Mithi river | मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर

मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर

Next

मुंबई : कुर्ला येथील मिठी नदीच्या किनारी राहत असलेल्या सुमारे बाराशे लोकांना जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. यांच्या मदतीला एनडीआरएफची टीम असली तरीदेखील मिठीला आलेल्या पुरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सकाळीच येथील लोकांना महापालिका आणि खासगी शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. रात्रीदेखील येथील पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे त्यांना रात्र घराबाहेरच काढावी लागली.

बुधवारच्या संततधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या सेवा बाधित झाल्या आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाºया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था करण्यात आली होती. शाळांमध्ये तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी, सतरंजी, बसण्यासाठी खुर्ची किंवा बाक इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती.
या सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. १४५ मनपा शाळांमध्ये तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था आहे. यापैकी रेल्वे स्थानकांजवळ असणाºया सर्व शाळांमध्ये तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था करण्यात आली होती.

शाळांची माहिती...
च्छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ व ९ च्या प्रवेशद्वारासमोर आणि जीपीओच्या (मोठे पोस्ट आॅफिस) देखील समोर असणाºया मनमोहन दास मनपा शाळा.
च्मशीद रेल्वेस्थानकाजवळ
जेआर मनपा उर्दू शाळा.
च्मरीन लाइन्स स्टेशन जवळ श्रीकांत पाटेकर मार्गावर चंदनवाडी मनपा शाळा.
च्मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा.
च्ग्रॅण्टरोड रेल्वे स्थानकाजवळ जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा.
च्भायखळा स्थानक, सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा.
च्मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाजवळ व हाफकिन इन्स्टिट्यूूटच्या बाजूला असणारी बारादेवी मनपा शाळा.
च्लोअर परेल पश्चिम व करी रोड पश्चिम या स्थानकांजवळ ना.म. जोशी मार्गावरील मनपा शाळा व साळसेकरवाडी मनपा शाळा.
च्दादर पश्चिम रेल्वेस्थानकाजवळ कबूतर खानाजवळ असणारी भवानी शंकर मनपा शाळा आणि पोतुर्गीज चर्चजवळ गोखले रोड मनपा शाळा क्रमांक दोन.
च्दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम परिसरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ असणारी दादर वूलन मिल मनपा शाळा.
च्माहीम स्टेशनजवळ सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळ असणारी मोरी रोड मनपा शाळा.
च्वांद्रे पूर्व, खेरवाडी मनपा शाळा.
च्सांताक्रूझ पूर्व स्टेशन जवळ वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा.
च्अंधेरी पश्चिम परिसरात टाटा कंपाउंड मनपा शाळा.
च्बोरिवली पश्चिम परिसरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाजवळ सोडावला लेन मनपा शाळा.
च्बोरिवली पूर्व परिसरात दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांकदोन.
च्घाटकोपर प., साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक २, बर्र्वे नगर मनपा शाळा, पंतनगर मनपा शाळा.
च्गोवंडी स्टेशन जवळ देवनार
कॉलनी मनपा शाळा.

Web Title: Migration of citizens living on the Mithi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.