अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:46 IST2025-08-23T16:42:31+5:302025-08-23T16:46:49+5:30

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अंधेरीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले

Migrant youth in Andheri abuses Raj Thackeray; Video goes viral, MNS workers angry | अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले

अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले

मुंबई - हिंदी भाषा सक्तीला विरोध आणि कडवट मराठी आंदोलनामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या टार्गेटवर आले आहेत. त्यातच अंधेरी येथील परप्रांतीय तरूणाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अर्वाच्य आणि अत्यंत घाण शब्दात शिवीगाळ केली आहे. या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत या युवकाने राज ठाकरेंना आई बहिणीवर शिवीगाळ केल्याचे दिसून येते. या व्हिडिओनंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या युवकाला धडा शिकवणार असा इशारा मनसेने दिला आहे.

राज ठाकरेंना शिवीगाळ केलेला हा युवक अंधेरी पुर्वेतील सुंदर नगर भागात राहतो. त्याचे नाव सुजित दुबे असं आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अंधेरीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. या व्हिडिओची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ शिवीगाळ करणाऱ्या युवकाला गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून संबंधित आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय सुजित दुबे या युवकाच्या ३ अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जर आरोपीविरोधात कठोर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे.

निशिकांत दुबे आणि राज ठाकरे यांच्यात शा‍ब्दिक चकमक

हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंविरोधात भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आला तर तुम्हाला पटक पटक के मारेंगे अशी धमकी दिली. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तु मुंबईत ये, तुला समुद्रात डुबे डुबे के मारेंगे असा टोला लगावला होता. 

नाशिकमध्येही परप्रांतीयाकडून मराठी माणसांना अपमान

नुकतेच नाशिकमध्येही जय भवानी रोडवर परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाला. यात वाहन शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने एका कारला धडक दिली. यानंतर हा परप्रांतीय व्यक्ती अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यात मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो अशी मुजोरी भाषा वापरली. या घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला समज द्यायचा प्रयत्न करत होते, त्यावेळीही परप्रांतीय व्यक्तीने मराठी बोलण्यास नकार दिला तेव्हा संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिल्याची घटना घडली आहे.

Web Title: Migrant youth in Andheri abuses Raj Thackeray; Video goes viral, MNS workers angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.