एक्स्प्लनेड मेंशन इमारतीतील बंद गाळे म्हाडाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:54 AM2019-06-12T02:54:16+5:302019-06-12T02:54:39+5:30

२५ बंद गाळ्यांची प्रक्रिया पूर्ण : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई

MHADA possession of closed plots in the Exploded Mansion building | एक्स्प्लनेड मेंशन इमारतीतील बंद गाळे म्हाडाच्या ताब्यात

एक्स्प्लनेड मेंशन इमारतीतील बंद गाळे म्हाडाच्या ताब्यात

Next

मुंबई : फोर्ट परिसरातील अतिधोकादायक असलेली एस्प्लनेड मेन्शन या इमारतीतील बंद असलेले गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया अखेर म्हाडाने सुरू केली आहे. आत्तापर्यंत २५ बंद घरे ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ उर्वरित गाळेही ताब्यात घेतले जाणार आहेत़ त्यानंतर पुढील कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

म्हाडाने नुकतीच अतिधोकादायक सेस इमारतींची यादी जाहिर केली. पावसाळापूर्व सर्वेक्षणातही एक्स्प्लनेड मेंशनचा समावेश करण्यात आला. या इमारतीतील शंभरपेक्षा अधिक रहिवाशांनी आपले गाळे खाली करून म्हाडाकडे त्याचा ताबा दिला आहे. परंतु यानंतरही ६४ जणांनी म्हाडाकडे ताबा न देता टाळे लावून गाळे बंद ठेवले आहे. बंद गाळ्यांची कुलूपे तोडून मालमत्ता आणि सामानांबाबत पंचनामा करावा, तसेच कायदेशीररित्या त्यांचा ताबा घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानुसार म्हाडाने ही प्रक्रिया सुरू केली आहे़ आत्तापर्यंत २५ गाळ्यांचे कुलूप तोडून पंचनामा आणी इतर प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरीतही गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयआयटी मुंबई यांनी या इमारतीबाबत दिलेल्या अहवालावर १९ जून रोजी होणाºया पुढील सुनावणीमध्ये न्यायालय निर्देश देणार आहे, या निर्देशांनुसार पुढील कारवाई करणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले.

इमारत दुरुस्तीपलीकडे
आयआयटी मुंबईने ही इमारत दुरूस्तीच्यापलिकडे असल्याने पाडणेच योग्य ठरेल असे अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. या इमारतीची दुरूस्ती करण्याएवजी ती पाडण्याची अनुमती द्यावी असा अर्ज म्हाडाने न्यायालयामध्ये दाखल केला आहे. अद्याप यावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होऊ शकलेली नाही. या सुनावणीनंतर या इमरतीचे भवितव्य ठरणार आहे़ त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़

Web Title: MHADA possession of closed plots in the Exploded Mansion building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.