मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 05:36 IST2025-01-12T05:35:47+5:302025-01-12T05:36:17+5:30

वेग मर्यादा हटविणे आणि सीसीआरएसकडून मिळालेले सुरक्षा प्रमाणपत्र यामुळे मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल. मुंबई इन मिनिट्स हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त  डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली. 

Metro will run at a speed of 80 kmph, Delhi's Chief Commissioner of Railway Safety has given safety certificate | मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र

मेट्रो धावणार ताशी ८० किमी वेगाने, दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी दिले सुरक्षा प्रमाणपत्र

मुंबई : नवी दिल्ली येथील रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी मुंबई पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता ५० ते ६० किमी प्रतितास धावणाऱ्या मुंबईच्या या दोन्ही मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावणार आहेत. 

वेग मर्यादा हटविणे आणि सीसीआरएसकडून मिळालेले सुरक्षा प्रमाणपत्र यामुळे मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल. मुंबई इन मिनिट्स हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त  डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली. 

मेट्रो लाइन ७ आणि २ असाठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहराच्या विकासाचा आधारस्तंभ करण्याचे आमचे वचन या विकासाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

मेट्रो विस्तारामुळे शहरात मोठा बदल घडत आहे. मेट्रो लाइन ७ आणि २ अ साठी मिळालेली नियमित मंजुरी ही एमएमआरडीएच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. यामुळे महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि प्रवाशांच्या जीवनमानात सुधारणा होईल. वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेट्रो नेटवर्कचा आणखी विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.     - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री.

Web Title: Metro will run at a speed of 80 kmph, Delhi's Chief Commissioner of Railway Safety has given safety certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.