मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 08:20 AM2023-10-14T08:20:12+5:302023-10-14T08:21:44+5:30

नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Metro can travel till late night | मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास 

मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास 

मुंबई : नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत अंधेरी पश्चिम आणि गुंदवली स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. 

सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त सेवांचा समावेश आहे. गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार - शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत २५३ मेट्रोसेवा आहे. शनिवारी, रविवार २०५ मेट्रोसेवा आठ ते साडेदहा मिनिटांने असेल. अंधेरी, गुंदवली स्थानकावर शेवटची मेट्रो १:३० वाजता पोहोचेल. 

नवरात्र उत्सवादरम्यान रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा करता येईल. प्रवासी मेट्रोला पसंती दर्शवित आहे. 
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरमहा सरासरी ५ टक्क्यांची वाढ आहे. नवरात्रोत्सव काळात अतिरिक्त सेवा सुरू केल्याने वाढ होईल. 
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए 
 

Web Title: Metro can travel till late night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.