मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:35 PM2020-09-10T16:35:21+5:302020-09-10T16:35:58+5:30

जानेवारीत होणार ट्रायल

Metro-2A and Metro-7 will run in May | मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार

मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार

googlenewsNext

मेट्रो-२ - दहिसर ते डि.एन. नगर

मेट्रो-७ - दहिसर ते अंधेरी

१०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे तिकिट

ड्रायव्हरलेस टेक्नोलॉजीवर धावणार मेट्रो

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सुरु असलेली मेट्रोची कामे वेगाने होत असून, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु  होणार आहेत. विशेषत: या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो रेल्वे कोच येत्या काही दिवसांत चारकोप डेपोत दाखल होणार असून, जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो धावणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी गुरुवारी मेट्रो २-अ आणि मेट्रो-७ च्या कामाबाबत प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी राजीव यांनी कोरोना काळात आलेल्या अडचणीसह मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या कामाचा आढावा घेतला.

आर.ए. राजीव यांनी सांगितले की, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७  डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरु आहे. ११ डिसेंबर रोजी मेट्रो कोचचे ३ सेट मुंबईत दाखल होणार आहेत. चारकोपमध्ये हे मेट्रो कोच दाखल होतील. एप्रिलमध्ये १० ट्रेन येतील. ट्रायल सुरु करण्यासाठी काही वेळ लागतो. किमान एक महिना यासाठीच वेळ विचारात घेतला आहे. १४ जानेवारीच्या आसपास आपण मेट्रोच्या ट्रायल सुरु करू. मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरु होतील, असा विश्वास आहे. दहा मेट्रो सुरु करतानाच दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल. सर्व योजना पुर्ण झाल्या आहेत. कोरोनामुळे काही अडचणी आल्या. कामगार कमी झाले. मात्र आम्ही अडचणींवर मात केली. 

............................

मेट्रो अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज आहे. मेट्रोमध्ये सुरुवातीला आपण ड्रायव्हरची मदत घेणार आहोत. मात्र मेट्रो ही ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी आहे. भविष्यात आपणाला ड्रायव्हरची गरज भासणार नाही.

Web Title: Metro-2A and Metro-7 will run in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.