Join us  

#MeToo : नाना पाटेकरांना अटक करा, ओशिवरा पोलीस ठाण्यावर महिला काँग्रेसचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:53 PM

#MeToo मोहीमेच्या माध्यमातून स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताला समर्थन दर्शवण्यासाठी महिला काँग्रेसने ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.

मुंबई - #MeToo मोहीमेच्या माध्यमातून स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताला समर्थन दर्शवण्यासाठी महिला काँग्रेसने ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. काँग्रेसच्या अजंता यादव यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासहीत अन्य तीन जणांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी यावेळी अजंता यादव यांनी केली आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दहा वर्षानंतर  त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या या धडसाला आम्ही सलाम करतो, या असं म्हणत मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अजंता यादव यांनी तनुश्रीचे कौतुक केले आहे.  तनुश्रीवर कामाच्या जागी चित्रिकरणायादरम्यान जो अत्याचार झाला, त्याबाबत तिने दहा वर्षानंतर तक्रार दाखल केली. याचाच अर्थ एक दशक तिची सुरू असलेली घुसमट आता बाहेर पडली. इतकी वर्षे ती या यातना सहन करत होती. आम्ही ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर आणि महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना पत्र देत एकच विनंती केली आहे, की दहा वर्षांनंतर तुम्ही जर तनुश्री प्रकरणात चौकशी करत आहात तर ती योग्य प्रकारे करावी. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी एक कमिटी नेमावी आणि एक हेल्पलाईन देखील तयार करावी. याचा वापर करून महिला त्यांच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची तक्रार त्यावर करु शकतील, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

नाना हे समाजसेवक आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र महिलेवर अत्याचार करणारा कोणीही असो मग तो कोणी मोठी व्यक्ती असो, कलाकार असो, आमदार असो, खासदार असो त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे असेही त्यांनी नमुद केले. एकंदरच तनुश्रीने कोणालाही न घाबरता पुढे येऊन अन्यायाला या मोर्चात अॅड सीमा सिंग यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

(#MeToo : नाना पाटेकरांसह चौघांवर होणार गुन्हा दाखल; बुरखा घालून तनुश्री ओशिवरा पोलीस ठाण्यात)

  

नेमके काय आहे प्रकरण?'हॉर्न ओके प्लीज' सिनेमातील एका गाण्याचं शूटिंग सुरू असताना नाना पाटेकरांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरिओग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात हे दाखवण्याचा अट्टहास नाना करत होते, असे तनुश्रीनं सांगितले.  एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं ही सारी हकीकत सांगितली. करारानुसार संबंधित गाणं सोलो होते, पण नानांना माझ्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता, असा गंभीर आरोपही तिने केला. ''कोरिओग्राफर मला स्टेप शिकवत असताना ते मध्येच येत, माझा हात पकडत. मी त्यांच्या या वागण्याला वैतागली आणि  चित्रपटाच्या निर्मात्यांकडे तक्रार केली. याचा परिणाम म्हणजे, मला या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले. आजही ती घटना आठवली की दचकायला होते, असा गंभीर आरोप तिने केला आहे.  माझ्यासोबतच नाही तर अन्य काही अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करुनही नाना चित्रपटसृष्टीत काम करत असल्याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे. कोणीही घाबरुन नानाविरोधात बोलत नसल्याचंही तिने म्हटले. 

तनुश्री दत्ताविषयीची माहिती2003मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005मध्ये 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'चॉकलेट', 'ढोल', 'रिस्क', 'स्पीड' या सिनेमांमध्येही झळकली.

8 ऑक्टोबर 2018 - नानांनी या कारणामुळे पत्रकार परिषद केली रद्द

तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांनी वकिलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवली.  यानंतर 8 ऑक्टोबरला नाना पाटेकरगणेश आचार्य, सामी सिद्दीकी असे सर्वजण एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेणार होते. पण नानांनी पत्रकार परिषद ऐनवेळेस रद्द केली. कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांनी पत्रकार परिषद रद्द केल्याचे म्हटले जात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.  

28 सप्टेंबर 2018 : तनुश्रीला पाठवली कायदेशीर नोटीसतनुश्री दत्तानं केलेले आरोप फेटाळल्यानंतर नाना पाटेकरांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली. तनुश्री दत्ताने केलेले आरोप खोट व बिनबुडाचे आहेत, असे नानांच्या वकिलांनी सांगितले. 

(Tanushree Dutta Harassment Case : तनुश्री दत्ताच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल!!)

27 सप्टेंबर 2018 : नानांनी सोडलं मौनतनुश्रीच्या आरोपांवर मौन सोडत नाना पाटेकर यांनी तिचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. सेटवर 100-200 लोक हजर होते. या सर्वांसमोर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असे ती का म्हणतेय, मला ठाऊक नाही. शेवटी कोणी काय बोलावं, हे मी कसे ठरवणार. मी फक्त एवढेचं सांगेन की, कोणी काहीही म्हणो, मला माझ्या आयुष्यात जे करायचे तेच मी करणार, असे नाना पाटेकर यांनी म्हटलंय. 

टॅग्स :काँग्रेसनाना पाटेकरतनुश्री दत्ताबॉलिवूड