Join us  

खगोलप्रेमींनी पाहिली शुक्र, बुध आणि चंद्राची युती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 3:31 PM

सूर्यास्तानंतर काही काळ या तिघांना खगोलप्रेमींना सोबत पाहता आले. खगोलांची अशी युती फारच कमी पाहता येते.

मुंबई - मान्सून काही दिवसांवर येऊ ठेपला आहे तरी अवकाश निरिक्षण करणाऱ्यांच्या संख्येत भरच पडत असून, खगोलप्रेमींना लॉकडाऊनच्या काळातही अवकाश निरिक्षण करता येत आहे. याच अवकाश निरिक्षणाच एक भाग म्हणून २२ मे रोजी शुक्र व बुध अगदी जवळजवळ दिसला आणि २४ मेच्या रात्रीही शुक्र, बुध आणि चंद्र याची युती खगोलप्रेमींना पश्चिमेच्या आकाशात पाहता आली. सूर्यास्तानंतर काही काळ या तिघांना खगोलप्रेमींना सोबत पाहता आले. खगोलांची अशी युती फारच कमी पाहता येते.

पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह म्हणजे आपला चंद्र होय. आकाशातील दुसरा सर्वांत जास्त चमकणारा हा चंद्र रविवारी रात्री पश्चिम आकाशात पाहायला मिळाला. सूर्यास्तानंतर लगेचच पश्चिमेस चंद्रकोर दिसली आणि चंद्र पाहून सोमवारी रमजान ईद जगभर साजरी झाली. 

सूर्य आणि चंद्रानंतर आकाशात तिसरा सर्वांत जास्त चमकतो तो एखादा तारा नाही तर तो आहे शुक्र ग्रह. याला सकाळचा तारा किंवा संध्याकाळचा तारा म्हटले जाते. सध्या शुक्र संध्याकाळचा तारा आहे. शुक्र आपण सूर्यास्तानंतर लगेच पश्चिम दिशेत सहज शोधू शकता.

दरम्यान, ध्रुवतारा हा आकाशातील सर्वांत जास्त चमकणारा तारा आहे, असा गैरसमज अनेकांना आहे. त्यामुळे बरेचजण शुक्राला ध्रुवतारा समझण्याची चूक करतात. ध्रुवतारा दिसायला अतिशय अंधुक आहे. मुंबईसारख्या शहरातून तो सहजपणे दिसतच नाही. ध्रुवतारा पाहण्यासाठी शहराच्या प्रकाशापासून दूर असलेल्या गडद आकाश असलेल्या ठिकाणी जावे लागते. 

बुध मुख्यतः एक निस्तेज ग्रह आहे. तो नेहमी सूर्याच्या जवळ असतो आणि म्हणून क्वचितच पाहायला मिळतो. पण गेल्या काही दिवसांत, बुध शुक्राच्या अगदी जवळ आकाशात दिसत आहे. बुध जास्त तेजस्वी नसल्यामुळे जरा नीट लक्ष देऊन पाहणे गरजेचे आहे.

शुक्रानंतर ग्रहांमध्ये गुरू चमकदार दिसतो. म्हणूनच शहराच्या आकाशातूनसुद्धा सहज ओळखता येतो. गुरू जवळजवळ वर्षभर एका नक्षत्रात राहतो. आजकाल गुरू मध्यरात्री उगवतो. मग रात्रभर आकाशात दिसत असल्यामुळे अनेकांनी त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

सध्या गुरू आणि शनी आकाशात एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. गुरूनंतर काही वेळात शनी उगवतो. म्हणूनच आकाशात शनी गुरूच्या जवळ दिसतो.

मंगळ हा ग्रह मध्यरात्रीनंतर उगवतो आणि म्हणूनच पहाटेच्या आकाशात दिसतो. लाल रंगामुळे ओळखला जाणारा मंगळ आकाशातून सहज ओळखता येतो. मात्र शहराच्या आकाशातून तसा फारच पुसट दिसतो.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

टॅग्स :मुंबई