देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 10:58 AM2020-05-25T10:58:46+5:302020-05-25T11:23:53+5:30

आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे.

मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे.

केवळ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भच नाही, तर निम्मा देश उष्णतेच्या लाटेने होरपळत आहे. देशातील अनेक शहरांचं तापमान हे 45 डिग्री सेल्सियस पार गेलं आहे.

उत्तर भारतात उष्णतेची लाट आली असून हवामान विभागाने राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या पाच राज्यांत रेड अलर्ट घोषित केला आहे.

पुढील दोन दिवसांसाठी या राज्यांत रेड अलर्ट असून या काळात नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत तापमान 47 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचू शकतं असं म्हटलं आहे.

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून येथील काही राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, या भागांना बसणार आहे.

विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. 25 आणि 26 मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहोचले आहे. आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा असाच चढा राहणार आहे.

मध्य प्रदेशातील बहुतांश शहरात 2 ते 4 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. परिणामी उष्णतेच्या लाटा वाहतील.

येत्या काही दिवसांत हवामानात उल्लेखनीय बदल होतील. मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.