आमदार नितेश राणेंविरोधात माझगाव कोर्टाचे वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 09:44 IST2023-11-22T09:43:17+5:302023-11-22T09:44:11+5:30

राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बदनामीकारक वक्तव्ये केली होती.

Mazgaon court warrant against MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंविरोधात माझगाव कोर्टाचे वॉरंट

आमदार नितेश राणेंविरोधात माझगाव कोर्टाचे वॉरंट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावत मंगळवारी, २१ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, नितेश राणे दंडाधिकारी न्यायालयात गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले आहे.   

राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बदनामीकारक वक्तव्ये केली होती. याप्रकरणी राऊत यांनी राणेंविरोधात माझगाव न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. 

Web Title: Mazgaon court warrant against MLA Nitesh Rane