वडाळ््यात रंगणार महापौर कबड्डी स्पर्धा
By Admin | Updated: March 20, 2017 21:34 IST2017-03-20T21:34:05+5:302017-03-20T21:34:05+5:30
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वडाळ््यात रंगणार महापौर कबड्डी स्पर्धा
मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वडाळा येथील भारतीय क्रीडा मैदानात २२ ते २५ मार्च दरम्यान कबड्डीचा थरार रंगणार आहे.
मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या विद्यमाने स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहे. पुरुष गटात १६ व्यावसायिक संघ आणि महिला गटात १२ स्थानिक संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे. मुंबईकरांना कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी चार क्रीडागंणावर प्रकाशझोतात सामने खेळवण्यात येणार आहे.
गतविजेता एअर इंडिया संघाला महिंद्रा संघासह अन्य संघाकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी एअर इंडिया संघासमोर विजेतेपद टिकवण्याचे आव्हान असणार आहे. तर महिला गटात शिवशक्ती संघ पुन्हा एकदा विजय मिळवतो का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (क्रीडा प्रतिनिधी)
.................................
व्यावसायिक पुरुष विभाग :
अ - गट :- १)एअर इंडिया , २)महाराष्ट्र पोलीस , ३)सेंट्रल बँक , ४)मुंबई बंदर.
ब -गट :- १)महिंद्रा अँड महिंद्रा , २)बी. ई. जी. ३)मुंबई पोलीस, ४)देना बँक.
क - गट :- १)नाशिक आर्मी , २)मध्य रेल्वे , ३)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण , ४)बँक आॅफ इंडिया .
ड - गट :- १)भारत पेट्रोलियम , २) आयकर विभाग, ३)युनियन बँक , ४)मुंबई महानगर पालिका.
स्थानिक महिला विभाग:
अ - गट :- १)शिवशक्ती संघ, २)छत्रपती मंडळ, ३)स्वराज्य संघ.
ब - गट :- १)राजमाता जिजाऊ , २)नवशक्ती मंडळ, ३)डॉ. शिरोडकर क्लब .
क - गट :- १)संघर्ष क्रीडा मंडळ, २)अमरहिंद मंडळ, ३)होतकरू मित्र मंडळ .
ड - गट :- १)मुंबई पोलीस महिला जिमखाना, २)महात्मा गांधी स्पोर्ट्स, ३)सुवर्णयुग मंडळ
................................