मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 15:25 IST2021-03-14T15:20:23+5:302021-03-14T15:25:11+5:30
Mumbai Fire : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या आणि जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
मुंबई - मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. साकीनाका जंक्शन परिसरात असणाऱ्या नीलकंठ भवन याठिकाणी आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या आणि जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (14 मार्च) सकाळी 11.45 च्या सुमारास मुंबईच्या साकीनाका परिसरात भीषण आग लागली. लेवल 1 ची आग असल्याचं अग्निशमन दलाने घोषित केले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. भीषण आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झाले आहे.
मुंबई - मेट्रो हॉटेल, साकीनाका जंक्शन, अंधेरी येथे भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखलhttps://t.co/CbvSFUjpi9#Mumbai#Firepic.twitter.com/cTEhNHi2pN
— Lokmat (@MiLOKMAT) March 14, 2021