ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 08:36 IST2025-04-27T08:31:48+5:302025-04-27T08:36:41+5:30
चार मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ग्राऊंड फ्लोअरवर ईडीचे कार्यालय आहे. वरच्या मजल्याला ही आग लागली आहे.

ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
मुंबई : मुंबईतील ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरील घराला मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. यामध्ये अख्खे घर भस्मसात झाले आहे.
या घरात पहाटे २.३० वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. लेव्हल दोनची ही आग होती. अद्याप ही आग विझविण्याचे काम सुरु आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे मुंबई अग्निशमन दलाने सांगितले आहे.
चार मजल्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ग्राऊंड फ्लोअरवर ईडीचे कार्यालय आहे. वरच्या मजल्याला ही आग लागली आहे. अद्याप आग धुमसत आहे. आग लागल्याच्या तासाभरानंतर आगीवर काहीसे नियंत्रण मिळण्यात आले. आग मोठी होती, परंतू ती चौथ्या मजल्यावरच पसरली, यामुळे खाली असलेली घरे, ईडीच्या कार्यालयाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra | Firefighting continues at Kaiser-I-Hind building, which houses Mumbai's ED office
— ANI (@ANI) April 27, 2025
The fire broke out at around 2:30 am. Fire engines rushed to the spot. Fire was updated to level 3 at around 4.21 am. No injuries reported: Mumbai Fire Department pic.twitter.com/p8YpJHxzYx
आग विझविण्यासाठी आठ अग्निशमन इंजिन, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर आणि इतर अनेक उपकरणे वापरण्यात आली. घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.