मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग, धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 02:24 IST2020-02-08T02:23:20+5:302020-02-08T02:24:28+5:30

पुण्यातील रांजणगाव परिसरात असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री गेली होती.

Marathi film actress humiliated, threatened | मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग, धमकी

मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग, धमकी

मुंबई : मराठी चित्रपट अभिनेत्रीचा विनयभंग करत, तिच्या आईला धमकीचा फोन केल्याप्रकरणी तिने गुरुवारी तीन अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल केली. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला असून, नंतर हे प्रकरण पुणे पोलिसांना वर्ग करण्यात आले.

पुण्यातील रांजणगाव परिसरात असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री गेली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तिघांनी तिला अश्लीलपणे स्पर्श केला. तेव्हा याची तक्रार तिने कार्यक्रमाच्या आयोजकांकडे केली. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने कार्यक्रम अर्धवट सोडून ती निघाली. तेव्हा रस्त्यात तिची कारही अडविण्यात आली, तसेच तिच्या आईलादेखील फोनवरून धमकी देण्यात आली, ज्या हार्टपेशंट आहेत.

साकिनाक्यातील रहिवासी असलेली ही अभिनेत्री गुरुवारी मुंबईत परतल्यानंतर तिने या प्रकरणी साकिनाका पोलिसांकडे तक्रार केली. ही घटना पुण्यात घडलेली असल्याने ते प्रकरण पुणे पोलिसांना वर्ग करण्यात आले असून, तेच पुढील तपास करणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Marathi film actress humiliated, threatened