Maratha Reservation Protest Live : चाकणमध्ये मराठा आंदोलनात गाड्यांची जाळपोळ, पोलिसांकडून कलम 144 लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:53 AM2018-07-30T10:53:13+5:302018-07-30T17:59:58+5:30
येत्या 9 ऑगस्टपर्यंत आरक्षण न मिळाल्यास राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
मुंबई - मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारनं वर्षभर कोणतीही हालचाल केलेली नाही. मात्र सरकारसोबत कोणतीही चर्चा करायची नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेत 9 ऑगस्टपर्यंत राज्यभर जनआंदोलन छेडलं आहे.
Live Updates :
- चाकण येथील हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे.
- 25 ते 30 गाड्या जाळण्यात आल्या असून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे.
- चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर
- चाकणमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, 100 ते 150 गाड्या फोडल्या
- चाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले, एसटी बस पेटवली
- चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. यात एक एसटी बस जाळण्याचा प्रयत्न झाला परंतु पोलिसांनी ती लगेच विझवली.
- परभणी : आरक्षणाच्या मागणीसाठी पाथरी येथील ढालेगाव बंधाऱ्यात उतरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
- हिंगोली : गांधी चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात
- पुणे - चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन
- हिंगोली : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने कळमनुरी येथील माळेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन
- यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी नेर शहरात कडकडीत बंद
- यवतमाळ : आरक्षणाच्या मागणीसाठी रिपाइं (ए) चे नेर पालिकेचे नगरसेवक मोहन भोयर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.
- कोल्हापुरात आरक्षणासाठी मराठा समाजाचं प्रतिकात्मक फाशी घेऊन अनोखं आंदोलन
- सोलापूरातील शिवाजी चौकात दगडफेक, पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली
- सोलापूर : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, सोलापूरमध्ये पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक
- सोलापूर : सोलापुरातील शिवाजी चौकामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार
- पुणे : चाकणमध्ये मराठा मोर्चा आंदोलनाला सुरुवात
- सोलापूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्हा 100 टक्के बंद
- बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तालुक्यातील धनेगावफाटा येथे रास्ता रोको आंदोलन
- मराठा आरक्षणासाठी आज सोलापूर बंदची हाक, वाखरी येथे मराठा आंदोलकांचा चक्काजाम
- सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिका परिवहन सेवेच्या बस बंद
- सोलापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी आज सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद, शाळा, महाविद्यालय बंद
- नाशिक : सकल मराठा समाजाच्यावतीने शिवसेनेचे देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप यांच्या निवास्थानी ठिय्या आंदोलन
- नंदुरबार- मराठा मोर्चा बंदला शहरात चांगला प्रतिसाद
औरंगाबाद : मुकुंदवाडी येथे मराठा क्रांती मोर्चाकडून रास्तारोको, परिसरातील बाजरपेठ बंद
औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकून प्रमोद होरे पाटील या तरुणानं रेल्वेखाली उडी देऊन केली आत्महत्या
सोलापूर :
जालना :
औरंगाबाद :