Maratha Kranti Morcha:...तब्बल 16 दिवसांनी सकल मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 17:54 IST2018-11-17T17:53:42+5:302018-11-17T17:54:19+5:30
सकल मराठा क्रांती मोर्चानं उपोषण मागे घेतले आहे. गेल्या जवळपास 16 दिवस हे उपोषण सुरू होतं.

Maratha Kranti Morcha:...तब्बल 16 दिवसांनी सकल मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण मागे
मुंबईः सकल मराठा क्रांती मोर्चानं उपोषण मागे घेतले आहे. गेल्या जवळपास 16 दिवस हे उपोषण सुरू होतं. भाजपा सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी उपोषण स्थळी जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. आझाद मैदानावरील उपोषण 16 दिवसांनी मागे घेण्यात आले आहे. मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण होणार असून, उपोषण कर्त्यांनीही मागण्या 10 दिवसांत मान्य करण्याची मागणी केली आहे.