‘ऑनलाइन वर्गात’ विद्यार्थ्यांचे ‘अ‍ॅबसेंट टीचर'!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:39 AM2020-08-12T04:39:48+5:302020-08-12T04:40:28+5:30

‘फी’च्या मुद्द्यावर अजूनही शाळेकडून काहीच निर्णय न झाल्याने वर्गात अजूनही गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

many Students are Absent in Online Class | ‘ऑनलाइन वर्गात’ विद्यार्थ्यांचे ‘अ‍ॅबसेंट टीचर'!

‘ऑनलाइन वर्गात’ विद्यार्थ्यांचे ‘अ‍ॅबसेंट टीचर'!

Next

मुंबई : कोरोनासाठीच्या ‘लॉकडाऊन’ ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नर्सरी ते इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाइन’ वर्ग शाळांकडून सुरू करण्यात आले आहेत. ‘फी’च्या मुद्द्यावर अजूनही शाळेकडून काहीच निर्णय न झाल्याने वर्गात अजूनही गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

नर्सरी ते इयत्ता दुसरीच्या मुलांचे ‘आॅनलाइन’ शिक्षण सुरू करण्याबाबत पालकांचे मत शाळांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी सर्व्हे फॉर्म किंवा अनेक ठिकाणी ईमेल आयडीवरही त्यांचे मत मागण्यात आले. त्यावेळीही फीचा मुद्दा पालकांनी उपस्थित केला होता. हळूहळू आॅनलाइन वर्ग भरण्यास सुरुवात झाली आणि काही पालकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान नको या उद्देशाने मुलांना त्यात बसविण्यास सुरुवात केली.
तर जे विद्यार्थी यात गैरहजर आहेत त्यांना शाळेच्या शिक्षकांकडून फोन करून याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांच्याकडून ‘आॅनलाइन’बाबत विरोध दर्शविण्यात आला. परिणामी त्यांनी आपल्या पाल्यांना अजूनही आॅनलाइन वर्गात बसविण्याची तयारी दर्शविली नसून फीबाबत निर्णय होईपर्यंत त्यांचा हा निर्णय ठाम असल्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

‘फी’ भरा! नाहीतर...
आॅनलाइन वर्गात शिकणाऱ्या तसेच न शिकणाºया मुलांना फी भरण्यासाठी शाळेकडून ईमेल तसेच मेसेज येत आहेत. अन्यथा ‘वर्कशीट’ दिली जाणार नाही, अशी तंबीही काही शाळांनी दिली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या पालकांना आता पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.

Web Title: many Students are Absent in Online Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.