मंत्री पंकजा मुंडेंशी फोनवर अश्लील बोलणाऱ्यास अटक; असभ्य संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 09:52 IST2025-05-03T09:52:31+5:302025-05-03T09:52:56+5:30
भाजपचे सोशल मीडिया कॉर्डिनेटर निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीच्या मोबाइल नंबरचे सीडीआर काढल्यानंतर तो मोबाइल क्रमांक पुण्यातला असल्याची माहिती नोडल सायबर पोलिसांना मिळाली.

मंत्री पंकजा मुंडेंशी फोनवर अश्लील बोलणाऱ्यास अटक; असभ्य संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली
मुंबई : राज्याच्या पर्यावरणमंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी फोनवर अश्लील संभाषण करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमोल काळे (२५, रा. परळी) असे त्याचे नाव आहे. तो पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
पोलिस ठाण्यात सन्मानाची वागणूक हा मूलभूत हक्क; असभ्य पोलिसाला दोन लाखांचा दंड
भाजपचे सोशल मीडिया कॉर्डिनेटर निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीच्या मोबाइल नंबरचे सीडीआर काढल्यानंतर तो मोबाइल क्रमांक पुण्यातला असल्याची माहिती नोडल सायबर पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती पुणे पोलिसांना दिली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोसरी परिसरातून काळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यानेच मुंडे यांना असभ्य संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीचा मोबाइल ताब्यात घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याने काही मेसेज डिलिट केल्याचे तपासातून उघड झाले आहे. आरोपीला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. विद्यार्थी असलेल्या या आरोपीने हा प्रकार का केला? याबाबत तो ठोस माहिती देत नसल्याने न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.