ईशान्य मुंबई: भाजपच्या मिहिर कोटेचांकडून अर्ज दाखल, मिरवणुकीत माजी आमदाराला धक्काबुक्की!

By मनीषा म्हात्रे | Published: April 26, 2024 01:04 PM2024-04-26T13:04:32+5:302024-04-26T13:06:35+5:30

महायुतीच्या उमेदवार मोहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. 

mahayuti candidate mihir kote entered the election office to fill his nomination form | ईशान्य मुंबई: भाजपच्या मिहिर कोटेचांकडून अर्ज दाखल, मिरवणुकीत माजी आमदाराला धक्काबुक्की!

ईशान्य मुंबई: भाजपच्या मिहिर कोटेचांकडून अर्ज दाखल, मिरवणुकीत माजी आमदाराला धक्काबुक्की!

मनीषा म्हात्रे, मुंबई :

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मोहिर कोटेचा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीकडून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जात असताना पोलिसांना कार्यकर्त्यांना अडवावं लागलं. या गडबडीत कोटेचा यांच्यासोबत आलेल्या शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रसंग घडला.  

अशोक पाटील हे मिहिर कोटेचा यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकार्यालयात जात असताना त्यांच्यासह काही जणांना अडविण्यात आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अशोक पाटील यांना पोलिसांना   "अहो मी आमदार आहे, मला सोडा असे  बोलत आपण आमदार असल्याची ओळख करून देण्याची वेळ आली. अखेर, पोलिसांचा विरोध झुगारून ते आतमध्ये जाताना दिसले. याच मतदार संघामध्ये काही दिवसांपूर्वी भाजपाच्या पहिल्या जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त करत सभा थांबवली होती.

मिहिर कोटेंची प्रतिक्रिया -

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला..मोदींच्या सैनिकांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.जनतेने ठरवलेले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. जनता निश्चित आशीर्वाद देवून मला दिल्लीला पाठवणार आहे. मी निवडून आल्यानंतर मुलुंडच्या नाहूर भागात रेल्वेच्या जागेत मुलुंड टर्मिनस सुरू करणार आहे.त्यावरून कोकण एक्सप्रेस सुरू करणार.विक्रोळी मानखुर्द डंपिंग ग्राउंड बंद करणार आणि मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने ताकदीने प्रयत्न करणार आहे. पूर्नवसन जिथे राहतात तिथेच करणार. हक्काचे घर मिळविण्याबाबत प्रयत्न करणार आहे.

Web Title: mahayuti candidate mihir kote entered the election office to fill his nomination form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.