राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. यानंतर, "अजित पवार हे स्पष्टवक्ता आणि दिलेला शब्द पाळणारे होते. दादांचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही," असे म्हणत शेकाप नेते जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले, "मी शून्य झालो आहे. सकाळी उठल्यावर ही वाईट बातमी कळली. अजित पवार हे स्पष्टवक्ता आणि दिलेला शब्द पाळणारे होते. महाराष्ट्रात संस्था बरोबर काम. करताना अजित पवारांसोबत जवळीक वाढली. ती कायम टिकली. अभ्यासपूर्ण वाचन करून उत्तर देणारे दादा होते. पवार कुटुंबीयांसोबत तीन पिढ्यांचे सबंध आहेत. ते आजही टिकून आहेत."
"दादा यांनी मार्केटिंग फेडरेशन, बँक मध्ये निर्णय प्रक्रियेत दरवेळी मला सामावून घेतले जात होते. महाराष्ट्राला गरज असताना आणि पवाराशी जवळीक झाली होती. काही दिवसापूर्वी शरद पवार, अजित पवार आणि मी असे तिघेजण तीन तास गप्पागोष्टी करीत होतो. ती आठवण सतावत आहे. दादांचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही. शेकाप आणि पाटील कुटुंबियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे," असेही पाटील यांनी म्हटले आहे.
Web Summary : Shekap leader Jayant Patil mourned Ajit Pawar's sudden demise, recalling his straightforwardness, commitment, and collaborative spirit. Patil reminisced about their close association, Pawar's inclusive decision-making, and recent conversations, emphasizing Pawar's open nature would be remembered by Maharashtra.
Web Summary : शेकाप नेता जयंत पाटिल ने अजित पवार के आकस्मिक निधन पर शोक व्यक्त किया, उनकी स्पष्टवादिता, प्रतिबद्धता और सहयोगी भावना को याद किया। पाटिल ने उनके घनिष्ठ संबंध, पवार के समावेशी निर्णय लेने और हाल की बातचीत को याद किया, और जोर दिया कि महाराष्ट्र पवार के खुले स्वभाव को याद रखेगा।