Maharashtra Vidhan Sabha 2019 - Versova Constituency Review | Vidhan Sabha 2019 : वर्सोवा मतदारसंघाला काय हवं ?

Vidhan Sabha 2019 : वर्सोवा मतदारसंघाला काय हवं ?

आमदाराचे नाव : डॉ. भारती लव्हेकर (भाजप)
मतदारसंघ : वर्सोवा
पुनर्विकास मार्गी लावणे. हॉस्पिटल व फायर ब्रिगेड व लोखंडवाला येथे पोस्ट आॅफीसची उभारणी. मेट्रोच्या कामामुळे लिंक रोडवरील कोंडी दूर करणे.
>हे घडलंय...
मतदार संघात आमदार फंडातून ४२ संरक्षक भिंती बांधल्या.
हिल पार्क येथे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत भव्य एनर्जी पार्क व बॉटनिकल गार्डन बनवण्याच्या कामाला सुरुवात.
कॅप्टन सावंत मार्ग येथे क्रीडांगण व बॉटनिकल गार्डनच्या कामाला सुरुवात.
लोखंडवाला तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात.
३२० कोटींच्या फिशिंग जेट्टीच्या कामाला लवकर सुरवात होणार
समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा व जोडरस्त्याचे काम प्रगती पथावर
>हे बिघडलंय...
वाहतूक कोंडी व खड्डयामुळे नागरिक हैराण
स्वातंत्र्य लढ्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक
कचरा समस्या
ओशिवरा नदीचे सुशोभीकरण
>वर्सोवा
मतदारसंघ
अंबोली विधानसभा मतदार संघाचे २००९ साली वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघ असे विभाजन झाले. मालाड क्रीक ब्रिज पासून ते वर्सोवा खाडी पर्यंत पसरलेला हा मतदारसंघ आहे. राज्यातील मोठे मासेमारी केंद्र आणि स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता, असे महत्व या मतदार संघाला आहे. एका बाजूला जोगेश्वरी पश्चिमेकडील संमिश्र प्रांतातून स्थायिक झालेली चाळ वस्ती, मध्यभागी असलेला लोखंडवाला, यारी रोड सारखा श्रीमंत उद्योजक, सिनेसृष्टीतील धनिकांची वास्तव, टोकाला असलेला कोळी समाज असा त्रिवेणी संगम असलेला हा बहुभाषिक मतदार संघ आहे. बहुभाषिक असलेल्या या विधानसभेचे भारती लव्हेकर या प्रतिनिधित्व करतात.
>पाच वर्षांत काय केलं?
मतदार संघातील गरजू नागरिकांना मुख्यमंत्री निधीतून सुमारे ५.५० कोटी वैद्यकीय मदत मिळवून दिली. वर्सोवा कोळीवाड्याचे सीमांकन करून घेतले. फायरब्रिगेडची उभारणी करण्यासाठी विकास आराखड्यात भूखंड आरक्षित करून घेतला. वर्सोव्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सी लिंक, तसेच मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी पाठपुरावा केला.
>विधिमंडळातील कामगिरी
नवीन विकास आरखडा अंमलबजावणी करणे. डिझेल परतावा लवकर देणे. वर्सोवा जेट्टीचे नवनिर्माण करणे. तिवरांच्या रक्षणासाठी बायो व चेनलिंक फेन्सिंगची निर्मिती करणे. वेसावे खाडीतील गाळ काढणे व धुप्रप्रतिबंधक बंधारा निर्मिती. फायरब्रिगेडची आवश्यकता. महिलांना मोफत सॅनेटरी पॅड व डिस्पोझेबल मशीन उभारणे असे अनेक विषय मांडले. विविध विषय विधानसभेत पोटतिडकीने मांडले. अभ्यासू म्हणून ठसा उमटवला.
>५ वर्षात विकास कामे केली नाहीत. लोटस इमारतीला २०१६ साली आग लागली होती. गगनचुंबी इमारती असून फायर ब्रिगेडची गरज आहे. याकडे आमदारांनी लक्ष दिले नाही. झोडपट्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
- प्रशांत राणे, मनसे शाखा अध्यक्ष, शाखा क्रमांक ६०
>त्यांना
काय वाटतं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोव्यासाठी २६ आॅगस्ट २०१५ रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चार उड्डाण पूलांना मंजुरी दिली. वर्सोवा ते मढ उड्डाणपूलाच्या कामाच्या निविदा निघाल्या. उर्वरित कामास सुरुवात होईल. वर्सोवा बंदरात बोटींना शाकारण्यासाठी आमदार निधीतून बंधारा बांधून दिला. वर्सोवा बंदरातील साचलेला ५५ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी पाठपुरावा केला.
- भारती लव्हेकर, आमदार, वर्सोवा
>ळडढ 5 वचनं
वर्सोव्याचा विकास
वर्सोवा जेट्टीचे नवनिर्माण व गाळ काढणे
वर्सोवा येथे फायरब्रिगेड
पर्यावरणाचे रक्षण
तिवरांच्या रक्षणासाठी बायो व चेन लिंक फेन्सिंगची निर्मिती

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - Versova Constituency Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.