Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: उद्धव ठाकरेंची हळूच 'पलटी'; म्हणे, ठरलाच नव्हता फॉर्म्युला 'फिफ्टी-फिफ्टी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:38 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरुन न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राम मंदिराचा खटला खूप वर्षापासून चालला आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात दिसू लागली आहे. शिवसेना-भाजपा युतीची घोषणा लवकरच होईल. 50-50 चा फॉर्म्युला मीडियाने पसरविला. आमचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीपूर्वीच ठरला आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घुमजाव केलं आहे. शिवसेना भवनात मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेला आहे. शिवसेनेची यादी आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री ठरवतील आणि आम्हाला देतील. त्यामुळे लवकरच युतीबाबत घोषणा होईल. तसेच नाणार, आरेबाबत विरोध स्थानिकांसाठी आहे. विकासकामाला कधी विरोध केला नाही, आरेमध्ये कारशेड करण्याला विरोध आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरुन न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राम मंदिराचा खटला खूप वर्षापासून चालला आहे. वर्षोनुवर्षे अयोध्येच्या निकालाकडे अपेक्षा लावून बसलो आहोत. कोर्टाकडून निर्णय होत नसेल तर सरकारने निर्णय घ्यावा ही आमची भूमिका होती. मात्र कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहा सांगत पंतप्रधानांनी थांबण्याची विनंती केली असेल तर त्यांचे योग्य आहे. कारण कोर्टाकडून झालेला निर्णय हा आनंदी असणार आहे. त्यात कोणताही पक्षपात नसेल त्यामुळे अयोध्या प्रश्नी कोर्टाच्या निर्णयाची प्रतिक्षा करणार असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. 

दरम्यान महाजनादेश यात्रेच्या समारोपाला भाजपाने बहुमत द्यावं असं आवाहन केलं, स्थिर सरकार चालविण्यासाठी बहुमत हवं असतं. मात्र शिवसेनेने गेल्या 5 वर्षात सरकारला दगा दिला नाही. राजीनाम्याबाबत एकदा मंत्र्यांनी विधान केले त्यानंतर कधी केलं नाही असा दावाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून युतीच्या जागावाटपावरुन शिवसेना-भाजपा यांच्यातील चर्चा थांबली होती. पण वरिष्ठांच्या आदेशामुळे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाने शिवसेनेला काही जागा वाढवून देण्यासाठी सहमती दिली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून 22 सप्टेंबर रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शिवसेना-भाजपा यांची युती अधिकृतरित्या जाहीर होऊ शकते असं बोललं जात आहे.  

आजच्या 'टॉप-5' राजकीय बातम्या

नरेंद्र मोदींनी राम मंदिरावरून 'बाण' मारला, उद्धव ठाकरेंचा सूरच बदलला!

मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?मराठी तरुणाईला उद्योजकतेचे धडे देणारे नामदेवराव 'वंचित बहुजन आघाडीत'

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'

घराणेशाहीला सांभाळूनच राष्ट्रवादीची तरुणांना संधी !

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019उद्धव ठाकरेराम मंदिर