तरुणांना शासन, प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी, 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप'ची युवक काँग्रेसकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:03 PM2020-06-02T17:03:43+5:302020-06-02T17:23:40+5:30

युवकांना प्रशासकीय, शासकीय,व राजकीय कामांचा अनुभव यावा,त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.  

Maharashtra Pradesh Youth Congress announces Dr. Shrikant Jichkar Leaders Fellowship | तरुणांना शासन, प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी, 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप'ची युवक काँग्रेसकडून घोषणा

तरुणांना शासन, प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी, 'डॉ. श्रीकांत जिचकार लिडर्स फेलोशिप'ची युवक काँग्रेसकडून घोषणा

Next

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसतर्फे   'श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशिप' या योजनेची सुरवात होत असल्याची माहिती आज अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली. डॉ. श्रीकांत जिचकर हे अष्टपैलू आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्त्व होते.विविध क्षेत्रांत त्यांनी  लोकोपयोगी कामे केली असल्याने युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांचे नाव या उपक्रमास दिले असल्याचे तांबे यांनी सांगितले.

युवकांना प्रशासकीय, शासकीय,व राजकीय कामांचा अनुभव यावा,त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.  हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वयवर्षे 21 ते 30 या वयोगटातील युवक  नोंदणी करू शकतात. या फेलोशिप अंतर्गत काँग्रेसच्या मंत्र्यासोबत युवकांना सहा महिने काम करण्याची संधी मिळेल.   पुढील ४ वर्षात एकूण 288  तरुण/तरुणींना फेलोशिप देण्याची योजना आहे.  याची नोंदणी आजपासून सुरू होत असून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवर  ऑनलाईन नोंदणीप्रक्रिये साठी लिंक उपलब्ध असुन हा नोंदणीप्रक्रियेची शेवटची तारीख 15 जुलै आहे.निवड झालेल्या उमेदवारांना 1 डिसेंबर पासून काम करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस व प्रवक्त्या रिशिका राका व सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रविणकुमार बिरादार या कार्यक्रमाचे समन्वयाचे काम पाहतील.

 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सातत्याने नवनवीन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव  देण्याचा प्रयत्न केला आहे.मागील दीड वर्षांत  वेक अप महाराष्ट्र , सुपर 60, युवा जोडो अभियान अशा विविध कार्यक्रमातुन सामान्य कुटुंबातील युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवक काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ श्रीकांत जिचकर लीडर्स फेलोशिप कार्यक्रम जाहीर करत आहोत, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Pradesh Youth Congress announces Dr. Shrikant Jichkar Leaders Fellowship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.