Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन दिवसापूर्वी आरोप पत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा अशी राज्यात मागणी सुरू आहे.दरम्यान, काल रात्री उशीरा देवगीरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन तास बैठक झाली आहे, या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले
या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. या बैठकीचा तपशील बाहेर आलेला नाही. पण, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात भावना तीव्र झाल्या आहेत. समाज माध्यमांवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.
कालपासून विधिमंडळाच्या अधिवेशानाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे. दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री ८.५० वाजता बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक १०.३० मिनिटांनी संपली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षांकडून राजीनाम्याची मागणी वाढली आहे.