Maharashtra Politics ( Marathi News ) : काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. पण, मनसे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांना अपयश आले. यानंतर राजकीय वर्तुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. 'ठाकरे बंधूंनी एकत्र यावे', अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनसमोर लावण्यात आले आहेत. दरम्यान, आता ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी 'बंधू मिलन' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले
या नवीन मोहीमेची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. गुढी पाडव्या दिवशी मोहनिश राऊळ यांनी 'बंधू मिलन' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर ठेवली आहे. या कार्यक्रमाचे आयोजनही स्मृतीस्थळावरच करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला येण्यासाठी दोन्ही ठाकरेंना विनंती केली जाणार आहे. यामुळे आता या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची मागणी समाजमाध्यमावर होत आहे.
निमंत्रण पुत्रिकेत काय आहे?
भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार.
बंधू मिलन कार्यक्रम दिनांक ३० मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे.
मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल.