Join us  

'आम्हाला अजित पवार अर्थमंत्री नको'; बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:26 PM

शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये अशी मागणी केली आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असल्याचे दिसत आहे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांनी अर्थखात देऊ नका अशी मागणी केली आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  आमदार बच्चू कडू यांनीही पवार यांनी अर्थखात देऊ नये अशी मागणी केली आहे. 

विरोधी पक्षांची पुढील बैठक बंगळुरूत, सोनिया गांधी उपस्थित राहणार, खरगेंनी पाठवले निमंत्रण पत्र

आमदार बच्चू कडू म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार यांनी केलेल्या कारणामुळे आम्ही फुटलो असं सांगत आलो आहे, आता तिच राष्ट्रवादी भाजपसोबत आली आहे. त्यामुळे हा मोठा पेच आहे, मी पाच वर्षात जे शिकलो ते २० वर्षात शिकलेलो नाही. देवेंद्र फडणवीस यांना वरुन आदेश असेल. लोकसभा महत्वाची आहे, त्यामुळे त्यांना हे करावे लागले असेल, असंही बच्चू कडू म्हणाले. 

'अजित पवार यांनी अर्थ खाते देऊ नये अशी आमची सर्वाची इच्छा आहे. त्यांना सगळ्यांचा विरोध आहे, राजकारणाला काही मर्यादा असणे फार गरजेचे आहे. गेल्या एक वर्षापासून विस्तार होणार म्हणून सांगितलं. आता विस्तार झाला पण मागून आलेल्यांना मंत्रिपद दिली, विस्तार करु शकत नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे म्हणजे आमदारांच्या डोक्यातून ते निघून जातं. मतदारसंघात अजित पवार यांची ढवळाढवळ चालून देणार नाही, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.  

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाला सात तर भाजपला सात मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार भरत गोगावले यांनी काल बोलताना सांगितले की, आम्ही फोनची वाट पाहत आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो. 

राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, अजुनही या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. काल या सर्व मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले. दरम्यान, काल मध्यरात्रिपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बौठकीत खातेवाटप तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :बच्चू कडूअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाएकनाथ शिंदे