Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:18 IST

२ जुलै रोजी राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई  - २ जुलै रोजी राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. आज खासदार शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आमदरांची बैठक घेतली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही बैठक घेतली. अजित पवार यांनी या बैठकीत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगोदर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत जाणार होती असा मोठा गौप्यस्फोट केला. 

मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही; अजित पवारांनी इतिहास सांगितला

अजित पवार म्हणाले,   महाविकास आघाडीत बंड होण्याअगोरच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार होती. भाजपसोबत या संदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार यांची कमिटी केली. भाजपच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा झाली. भाजपचे नेते म्हणाले असल्या गोष्टी फोनवर बोलत नाही. तुम्ही इंदूरला या. इंदूरची आम्ही तिकिट काढली. त्यावेळी आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही इंदूरला गेलात तर मीडियाला कळेल. त्यावेळी त्यामुळे सगळं बारगळले. तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता. यातल एक जरी खोट असले तरी माझ्याकडे सगळ्या आमदारांचे पत्र आहे, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. 

आमचे वरिष्ठ असं प्रत्येकवेळी का करतात. एखादा माणूस काम करत असताना ५८ व्या वर्षी कामातून रिटायर्ड होतात. तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या. चुकलं तर आम्हाला चुकलं म्हणून सांगा, असंही अजित पवार म्हणाले. वयं जास्त झालं, ८३ वर्षे झाले तुमचे वयं. तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या. मला त्यांनी त्यावेळी राजीनामा देणार असं सांगितलं आणि पुन्हा राजीनामा परत घेतला, आम्ही तेव्हा सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी तयार होतो आम्ही या सगळ्या गोष्टीला तयार होतो, असंही पवार म्हणाले. 

मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. मी त्यात अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सकाळी लवकर कामाला सुरूवात करतो. देशाचे पहिल्या नंबरचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करताना साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलोय, तयार झालोय यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येकाचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या २५ व्या वर्षापासून ७५ पर्यंत उत्तमरितीने काम करू शकतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष