Join us

Maharashtra Lockdown: मोठी बातमी! महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; उद्यापासून काय बंद आणि काय सुरू? वाचा संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 15:06 IST

Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत.

Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत. राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकानं बंद राहणार आहेत. मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. 

स्थानिक प्रशासनाला त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेता येईल, असं राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यात निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्यांवर वर्दळही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता याबाबतचं अधिकृत पत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

काय आहेत नवे नियम? काय राहणार सुरू आणि काय बंद?

  • राज्यात आता सर्व किराणा, भाज्यांची दुकानं, फळ विक्रेते, डेरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकानं (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकानं आणि शेती संबंधिची दुकानं, पाळीव प्राण्याची खाद्य दुकानं सकाळी ७ ते सकाळी ११ अशा केवळ चार तास सुरू ठेवता येणार आहेत. 
  • वरील सर्व दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे. 
  •  त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकांच्या वेळांबाबत निर्णय घेता येणार आहे. 

काय राहणार बंद?राज्यात १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असलेले इतर कडक निर्बंध हे कायम असणार आहेत. 

  • राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील
  • शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील
  • क्रीडा संकुलं आणि स्टेडियम देखील बंद राहणार
  • धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना देखील परवानगी नाही.
  • विवाहासाठी केवळ २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी
  • अंत्यसंस्कारासाठी केवळ २० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी
  •  सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील
टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेअजित पवारकोरोनाची लस