Rajesh Tope: लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:55 PM2021-04-07T12:55:30+5:302021-04-07T12:56:09+5:30

Rajesh Tope On Corona Vaccination: महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

maharashtra health minister rajesh tope says told center about vaccine shortage many inoculation centers forced to shut down | Rajesh Tope: लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले

Rajesh Tope: लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले

Next

Rajesh Tope On Corona Vaccination: महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लशीच्या पुरवठ्या संदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त केला. 

"राज्यात आज काही ठिकाणी लस उपलब्ध नाही म्हणून नाईलाजानं लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाही दिली आहे. केंद्राकडून लशीचा पुरवठा सुरू आहे पण त्यात गती नाही", असं राजेश टोपे म्हणाले. 

आठवड्याला ४० लाख डोस हवेत
देशात लसीकरणाच्याबाबतीत महाराष्ट्र नंबर एकचं राज्य ठरत आहे. त्यामुळे राज्याची गरज लक्षात घेता केंद्रानं महाराष्ट्राला दरआठवड्याला कोरोना लशीचे ४० लाख डोस पुरवावेत अशी मागणी टोपे यांनी केली आहे. राज्यात लसीकरण वेगानं होतंय आणि यापुढील काळात याचा वेग आणखी वाढवला जाईल. पण त्याच तुलनेत लशीचा पुरवाठा देखील राज्याला व्हायला हवा, असं टोपे म्हणाले. 

राज्यात फक्त ३ दिवस पुरेल इतकाच साठा
राज्यात १४ लाख इतकाच लशीचा साठा शिल्लक असून तो तीन दिवसांत संपेल. त्यामुळे केंद्रानं याची नोंद घेऊन मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर लस राज्यांना द्यायला हवी. केंद्र सरकार लशीचा पुरवठा करत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. पण होणारा पुरवठा आणखी वेगानं व्हायला हवा, असं राजेश टोपे म्हणाले. 

कोरोनाचं राजकारण नको
कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातील उपचार असोत निर्बंध असोत किंवा मग लसीकरण असो अशा कोणत्याही बाबतीत राजकारण करण्याची ही वेळ नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसं आवाहन केलं आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास समर्थन दिलं आहे. त्यामुळे विरोधकांनीही निर्बंधांना विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देऊ नये. परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं आणि खरंच एखद्या वर्गाला निर्बंधातून सूट देण्याची गरज असेल तर राज्य सरकारचा त्याचा विचार करुन निर्णय घेईल, असं राजेश टोपे म्हणाले. 
 

Read in English

Web Title: maharashtra health minister rajesh tope says told center about vaccine shortage many inoculation centers forced to shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.