Join us

Maharashtra Government : उद्धव ठाकरेंनी पुत्रप्रेमापोटीच भाजपाला सोडलं, केंद्रीय मंत्र्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 15:14 IST

पश्चिमी उत्तर प्रदेशमधील वाढत्या लोकसंख्येमुळे असंतुलित परिस्थिती निर्माण होत आहे.

मुंबई - अयोध्येतील राम मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून सर्वच स्तरातून याचं स्वागत करण्यात आलं आहे. राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता लोकसंख्या नियंत्रणसंबंधी कायदा बनविण्याची आवश्यकता आहे, असे माझं वैयक्तिक मत असल्याचं केंद्रीयमंत्री संजीव बलियान यांनी म्हटलंय. शुक्रवारी सायंकाळी एका शाळेतील कार्यक्रमाला बलियान यांनी हजेरी लावली होती. यावेळी, बलियान यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना, शिवसेनेला लक्ष्य केलं.

पश्चिमी उत्तर प्रदेशमधील वाढत्या लोकसंख्येमुळे असंतुलित परिस्थिती निर्माण होत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कलन 370 हटविल्यानंतर, आणि राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर आता लोकसंख्या नियंत्रण कायदा करणं गरजेचं असल्याचं मंत्री संजीव यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही भाष्य करण्याचा मोह संजीव यांना आवरता आला नाही. उद्धव ठाकरेंनी पुत्रप्रेमात येऊनच भाजपाची साथ सोडली, असे बलियान यांनी म्हटलंय. भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांच्याकडेच बहुमताचा आकडा होता. पण, आता किती दिवसांपर्यत शिवसेना दुसऱ्या पक्षांसोबत राहते, हेच पाहायचे आहे, असे बलियान यांनी म्हटलं.   

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपाआदित्य ठाकरे